Grampanchayat election saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election 2023 : नाशिकमध्ये ग्रामपंचायत निवडणूक उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; कोल्हापूर, अमरावतीतही गोंधळ

Nashik News : रंजन गोर्धने असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील ही घटना आहे.

प्रविण वाकचौरे

Grampanchayat Election 2023 :

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीमध्ये आज मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेआधी नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट लागलं आहे. नाशिकामधील इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवाराच्या पतीवर रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील ही घटना आहे. रंजन गोर्धने असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास रंजन हे रस्तात उभे असताना अचानक टोळक्याने त्यांच्या हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Latest Marathi News)

अमरावतीत दोन गटात बाचाबाची

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाची पाहायला मिळाली. मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून हा वाद झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखेर पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. या घटनेनंतर मतदान केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या आतमध्ये येण्यास मज्जाव केला आहे.

कोल्हापुरातही गोंधळ

कोल्हापूर जिल्ह्यातही 89 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक तर 12 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका आज पार पाडत आहेत. कोल्हापुरातील चिंचवाड मतदान केंद्राबाहेर राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मतदारांवर दबाव टाकल्याचा आरोप करत एका गटाने राडा घातला. त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT