Grampanchayat Election 2023 Saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election 2023: बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलकडून पैसे वाटप? पांडुरंग कचरे यांचा गंभीर आरोप

Grampanchayat Election 2023 Baramati: उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या ग्रामपंचायतमध्ये आमचाच झेंडा रोवला जाईल असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

Ruchika Jadhav

मंगेश कचरे

Baramati Grampanchayat Election:

बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये बहुजन ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांनी राष्ट्रवादी गटाच्या पॅनलकडून पैसे वाटल्याचा आरोप केलाय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसून जाणीवपूर्वक काही गाव पुढारी गावाला वेठीस धरून काम करत असल्याचा आरोप देखील बहुजन ग्रामविकास पॅनलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावामध्ये केलेल्या विकास कामांमुळे जनता आमच्या पाठीशी असल्याचा निर्धार राष्ट्रवादी पुरस्कृत जय भवानी माता पॅनलचे प्रमुख विद्याधर काटे यांनी केलाय. उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या ग्रामपंचायतमध्ये आमचाच झेंडा रोवला जाईल असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं.

तर पांडुरंग कचरे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. आम्ही कुणालाही पैसे वाटले नाही. उलट बहुजन ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात आले आहे. असं काटेंनी म्हटलंय.

आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्हयातील २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका तर १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीमध्ये ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT