Teacher Constituency Election Result Saam Tv
महाराष्ट्र

Election Result 2023: संशयास्पद खूण आढळल्याने वाद, भाजप उमेदवार आणि कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली

एका मतपत्रिकेवर संशयास्पद खुण पाहून जोरदार बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.

Gangappa Pujari

माधव सावरगावे..

Teacher Constituency Election Result: मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सकाळी ११.३० वाजता एका मतपत्रिकेवर संशयास्पद खुण पाहून भाजप उमेदवार किरण पाटील यांचे प्रतिनिधी शिवाजी दांडगे आणि मतमोजणी अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. ज्यामुळे चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे मतमोजणी स्थळी तणाव निर्माण झाला होता. अखेर निवडणुक निर्माण अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मध्यस्थीने वाद निवळला. (Latest Marathi News)

समोर आलेल्या माहितीनुसार, मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रारंभी मतपेट्या उघडून मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर मतांचे २५-२५ चे गठ्ठे करुन मोजणीसाठी ५६ टेबलवर प्रत्येकी ४० गठ्ठे देण्यात आले. दुपारी १२ वाजेपासून वैध-अवैध मतांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी एका टेबलवर एका मतपत्रिकेवर संशयास्पद खुण आढळून आल्याने भाजप (BJP) उमेदवार पाटील यांचे प्रतिनिधी शिवाजी दांडगे यांनी आक्षेप घेतला.

त्यावरुन मतमोजणी अधिकारी व दांडगे यांच्यात वाद होऊन बाचाबाची झाली. या मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीचे मत विक्रम काळेंना तर दुसर्‍या पसंतीचे मत किरण पाटील यांना नोंदवलेले होते. शिवाय त्यात संशयास्पद खुण आढळली होती. त्यामुळे हा वाद झाल्याचे सांगण्यात आले.

यानंतर केंद्रेकर यांनी शांततेत काम करा अन्यथा बाहेर काढले जाईल, असा इशारा दिल्यानंतर वाद निवळला. दरम्यान मतदान ५३ हजार २६७ एवढे असल्याने व एका टेबलवर एक हजार मतांची मोजणी होणार असल्याने ५६ पैकी ३ टेबलावरील काम बंद करण्यात आले. सध्या पहिल्या पसंतीच्या मतांसाठी विक्रम काळे, सुर्यकांत विश्वासराव आणि किरण पाटील या उमेदवारांच्या मतपत्रिकाच पुढे येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold and Silver: भारतीय सराफ बाजारात होणार भूकंप; सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

SCROLL FOR NEXT