Ramesh Bais Saam Tv
महाराष्ट्र

Governor Ramesh Bais: राज्यपाल रमेश बैस वादाच्या विळख्यात; जंजिरा किल्ल्याबाबत मोठं वक्तव्य

Janjira Fort: राज्यपाल रमेश बैस देखील जंजिरा किल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चेचा विषय ठरत आहेत.

Ruchika Jadhav

Governor Ramesh Bais On Janjira Fort: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यांनंतर आता राज्यपाल रमेश बैस हे देखील आपल्या वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला. तसेच महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ते वादात सापडले होते. आता राज्यपाल रमेश बैस देखील जंजिरा किल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. (Political News)

काल ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, दिपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी जंजिरा किल्ल्याचा चुकीचा इतिहास सांगितला.

काय म्हणाले राज्यपाल?

जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला. बाजीराव पेशव्यांना विसरून चालणार नाही, जंजिरा किल्ल्याला त्यांनीच मुक्त केल, असं विधान रमेश बैस यांनी केलं आहे.राज्यपालांच्या चुकीच्या वक्तव्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच बाजीराव पेशव्यांबाबत राज्यपालांना चुकीची माहिती कुणी दिली असा प्रश्न उपस्थित होतोय.

इतिहास काय सांगतो?

सतराव्या शतकात अंबर सिद्दीनं जंजिरा किल्ल्यावर (Janjira Fort) आपली सत्ता प्रस्थापित केली, पुढे ३३० वर्षे जंजिरा किल्ला त्यांच्याकडेच राहिला. तसेच इंग्रजांच्या काळात सिद्दीनी मांडलिकत्व पत्करलं होतं. त्यामुळे सिद्दीच जंजिऱ्याचे किल्लेदार राहिले होते. स्वातंत्र्यानंतर संस्थान विलिनिकरण करण्यात आले. त्यावेळी जंजिरा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

महाराष्ट्रासाठी काही करायचं असेल, तर....; राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र

Maharashtra Politics: काँग्रेसने केला भाजपचा गेम, बालेकिल्ल्यातच भाजपला दिला शह

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, ८.१९ मिनिटांनी जाणवले हादरे

SCROLL FOR NEXT