Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut on Government: सरकारचं 'डेथ वॉरंट' निघालं,15 दिवसात सरकार कोसळणार; संजय राऊतांच्या दाव्याने चर्चेला उधाण

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या या सभेपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Shivani Tichkule

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण तापलं असून ठाकरे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या सभेपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. (Latest Marathi News)

आगामी 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर या सरकारचं 'डेथ वॉरंट' निघाले असल्याचं देखील राऊत म्हणाले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसात गडगडल्या शिवाय राहणार नाही.

तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही, या सरकारचा 'डेथ वॉरंट' निघालेलं आहे येत्या 15 ते 20 दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. (Latest Political News)

उद्धव ठाकरे यांचा पाचोरा दौरा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी ११.०० वाजता मुंबई येथून जळगावकडे खाजगी विमानाने प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता ते जळगाव विमानतळ येथे दाखल होतील आणि येथून वाहनाने पाचोराकडे रवाना होतील. यानंतर दुपारी १.३० वाजता पाचोरा शहरात वरखेडी फाटा येथून महाराणा प्रताप चौकपर्यंत मोटरसायकल रॅली काढली जाईल आणि महाराणा प्रताप चौक येथे स्वागत केले जाईल. दुपारी २.०० वा. ते ४.३० पर्यंत निर्मल सिड्स रेस्ट हाऊस येथे जेवण आणि राखीव वेळ असेल.

दुपारी ४.३० वा. ते ५.३० ते निर्मल सिड्स समोरील नवीन इमारतीजवळ मोकळ्या जागी जळगाव जिल्ह्यातील उद्योजक यांच्याशी चर्चा करतील. तसेच निर्मल सिड्स येथील भारतातील प्रथम अत्याधुनिक नवीन तयार करण्यात आलेल्या लॅबचे उद्घाटन करतील. माजी आमदार आर ओ पाटील यांचा ११ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देखील ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT