राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार... भारत नागणे
महाराष्ट्र

राज्यातील वारकऱ्यांना मानधन देण्याचा शासनाचा विचार...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वारकरी संप्रदायातील गायक, वादक, कीर्तनकार‌आणि प्रवचनकार यांना ५ हजार रुपये मानधन

भारत नागणे

पंढरपूर : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर राज्यातील वारकरी संप्रदायातील गायक, वादक, कीर्तनकार‌आणि प्रवचनकार यांना ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.

यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वारकऱ्यांना प्रति महिना ५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत.

हे देखील पहा-

याचा फटका कीर्तनकार ,प्रवचनकार, वादक आणि गायक अशा लोकांना बसला आहे. याबरोबरच फडकरी महाराज मंडळींचे कार्यक्रम बंद आहेत. यामुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी महाराज मंडळींना प्रति महिना ५ हजार रुपये मानधन द्यावे, कलाकारांच्या मानधनात दुप्पट वाढ करावी.

यासह इतर प्रमुख मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वारकऱ्यांना मानधन देण्याच्या प्रश्नाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे लवकरच आता राज्यातील महाराज मंडळींना दिलासा मिळणार असल्याचे विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT