सरकारकडे पैसे नाही, कर्ज काढून सरकार पगार देत आहे - जितेंद्र आव्हाड  SaamTv
महाराष्ट्र

सरकारकडे पैसे नाही, कर्ज काढून सरकार पगार देत आहे - जितेंद्र आव्हाड

धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसोबत चर्चा करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आज उल्हासनगरात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात काही दिवसांत इमारतींचे स्लॅब कोसळून १२ जणांचे बळी गेलेत. त्यामुळे महापालिकेने अतिधोकादायक इमारतींवर धडक कारवाई सुरू केली असून १२२ इमारतींचं वीज-पाणी तातडीनं तोडण्याचे आदेश महापालिकेनं दिलेत. या कारवाईने इमारतीमधील रहिवासी धास्तावले आहेत. The government has no money, the government is paying salaries by taking out loans - Jitendra Awhad

धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसोबत चर्चा करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आज उल्हासनगरात आले होते. यावेळी शहरातील रहिवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने चर्चा सत्राचे आयोजनं केले होते. यावेळी इमारतींचे पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी रहिवाश्यांच्या वतीने करण्यात आली

यावर बोलतांना जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे पैसे नाही सरकार कर्ज घेऊन पगार देत आहे. त्यामुळे सरकारकडून अपेक्षा करू नका असे सांगितले, मी सरकारचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आलो आहे. मी तुमचा मुद्दा नगरविकास मंत्रालयापर्यंत पोहचवेन आणि लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

तसेच निर्वासितांच्या शहरांसाठी स्वतंत्र कायदा करण्याचा विचार करण्याची गरज असून आपल्याला कोणीही बेघर करणारा नाही याची मी हमी देतो असेही आव्हाड पुढे म्हणाले. भारत-पाकिस्तान फाळणी नंतर ज्या शहरात निर्वासित आलेत त्यात ठाणे असो या उल्हासनगर या शहरांच नवं डेव्हलपमेंट मॉडेल बनलं पाहिजे असं मत आव्हाड यांनी आपल्या भाषणात मांडलं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT