Abhijit Dipke announces new school reform movement through CJP saam tv
महाराष्ट्र

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Abhijeet Dipke Government School Movement : NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर अभिजित दिपके यांनी सरकारी आणि खासगी शाळांच्या सुधारणेसाठी नव्या मोहिमेची घोषणा केली आहे.

Suprim Maskar

नीट पेपरफुटीवरून दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपकेंनी आता नवीन मोहिमेची घोषणा केलीय.सरकारी आणि खासगी शाळा आता दिपकेंच्या रडारवर आहेत. ही मोहीम नेमकी काय आहे? दिपकेंनी काय आवाहन केलयं ? पाहूयात या रिपोर्टमधून.

देश स्वातंत्र्याचं 80 वं वर्ष साजरी करत असलं तरी ग्रामीण भागातील सरकारी शाळांची अवस्था मात्र अजूनही दयनीयच आहे.त्यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्याही घटत असल्याचं विदारक वास्तव वारंवार समोर आलयं. त्यामुळे CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंनी नीट पेपरफुटीनंतर आता आपला मोर्चा थेट सरकारी शाळांकडे वळवलाय. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी 15 ऑगस्टपासून विशेष मोहीम सुरू करण्याची मोठी घोषणा अभिजीत दिपकेंनी केलीय. यावेळी त्य़ांनी नवी संसद आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून भाजपवर निशाणा साधलाय.

अभिजीत दिपकेंचा 15 ऑगस्टचा प्लॅन

CJPचे अभिजित दिपके सरकारी शाळांसाठी मोहीम सुरू करणार

शाळांमध्ये जाऊन सोयी-सुविधांची पाहणी करणार

हिंगोलीत सरपंचांकडे शाळा दुरुस्तीची मागणी करणार

पालकांना शाळेचं सोशल ऑडिट करण्याचा दिपकेंचा सल्ला

सुविधा नसल्यास व्हिडिओ काढण्याचं, फॉर्म भरण्याचं आवाहन

फक्त सरकारी शाळाचं नव्हे तर CJP खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधातही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपयांची फी कशी असू शकते असा सवालही दिपकेंनी उपस्थित केलीय. एकिकडे सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या दर्जावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं.

त्यामुळेच पालक खासगी शाळांक़डे धावतात. मात्र याचाच फायदा उचलत खासगी इंग्रजी शाळा पालकांची सर्रास लूट करतात. सरकार केवळ कारवाईबाबत आश्वासनाच्या डरकाळ्या फोडत असतं. त्यामुळे खासगी शाळांना शह देण्यासाठी सरकारी शाळांचा दर्जा सुधारणं हा एकमेव पर्याय आहे. आणि त्यालाच दिपकेंनी हात घातल्यामुळे आता ही मोहीम जोर धरणार का? सरकार याबाबत गंभीर पावलं उचलणार का? सीजेपीच्या याही आंदोलनाला यश मिळणार का? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT