sharad pawar ajit pawar x
महाराष्ट्र

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Ajit Pawar Gains Ground in Nanded: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शिरीष आणि कैलाश गोरठेकर शेकडो समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला नांदेडमध्ये धक्का बसणार.

Bhagyashree Kamble

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना नांदेडमध्ये राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात इनकमिंग वाढली आहे. तर, नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सक्रिय असलेले शिरीष गोरठेकर आणि कैलाश गोरठेकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षाला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करतील.

ऐन निवडणुकींच्या तोंडावर नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसला आहे. शिरीष गोरठेकर आणि कैलाश गोरठेकर आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवार गटात शनिवारी पक्षप्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे उमरी तालुक्यात अजित पवार गटाची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी उमरी आणि देगलूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रेवश सोहळा पार पडणार आहे.

नांदेड जिल्ह्यात गोरठेकर कुटुंबाचं मोठं नाव आहे. कैलाश गोरठेकर आणि शिरीष गोरठेकर गोरठेकर कुटुंबातील तिसरी पिढी मानली जात आहे. शिरीष गोरठेकर हे उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. तर, कैलाश गोरठेकर हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असल्याची माहिती आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरठेकर कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच आपल्या समर्थकांसह गोरठेकर बंधू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करतील. मिळालेल्या माहितीनुसार, हा पक्षप्रवेश सोहळा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित पार पडणार आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला सुनील तटकरे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील इतर नेते उपस्थित असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : डार्क चॉकलेटपासून बनलेला 'हा' पदार्थ तुमचे वजन झटपट कमी करेल, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : परभणीत उष्णतेचा कहर; ४३ अंश तापमानात ट्रान्सफॉर्मरना बसले कुलर

Maharashtra School: विद्यार्थी अन् पालकांसाठी महत्त्वाची बातमी, यापुढे निकालासह उत्तरपत्रिकाही पाहायला मिळणार

Health Care: डायबिटीज असतानाही नारळपाणी प्यावे का? उपाशी पोटी प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात?

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; आमदार-खासदारांचे नियोजित दौरे रद्द, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT