Gopichand Padalkar Saam TV
महाराष्ट्र

Gopichand Padalkar: सातवं वेतन आयोग मिळालंच पाहिजे...; एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पडळकरांचं उद्या उपोषण

Gopichand Padalkar News: एसटी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग मिळालंच पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गोपीचंद पडळकर उद्या उपोषण करणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना सातवे वेतन लागू करण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर सांगलीत उद्या एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. त्यांची संघटना 'सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ' एक दिवसीय लाक्षणिय उपोषण करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग मिळालंच पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरूवात होणारे. विविध मागण्या पुढीलप्रमाणे

1 - सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी

2- आंदोलन काळातील दिनांक 27/10/2021 ते 22/04/2022 पर्यंतचा आंदोलनाचा काळ विशेष बाब म्हणून वार्षिक वेतनवाढ उपदानासाठी ग्राह्य धरण्यात यावा

3- 2017 मधील आगार बदलीचे परिपत्रक रद्द करून शिस्त व आवेदन कार्य पद्धतीमधील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात.

4- कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी

5- एप्रिल 2016 पासून वार्षिक वेतन वाढ महागाई भत्ता व घर भाडे याचा फरक मिळावा

6- दिवाळी भेट 5000 ऐवजी 15000 रुपये देण्यात यावी.

7- लिपिक पदाच्या भरतीसाठी 240 दिवसाची अट रद्द करावी

8- शासनाने जाहीर केलेल्या 5150 इलेक्ट्रिक वाहने बस खाजगी न देता महामंडळाच्या स्वमालकीच्या देण्यात यावेत

राज्य एसटी कामगार संघटनेने या आधी आझाद मैदानावर देखील विविध मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावर राज्य सरकारने मागण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कामगारांनी आंदोलन स्थगित केलं आहे. अशात आता एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या पुन्हा एकदा आंदोलन केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : पाऊस, समुद्रकिनारा अन् गरम चहा; मुंबईतील 'हे' प्रसिद्ध ठिकाण, जेथे असते दिवसरात्र गर्दी

Thackeray Brothers : ठाकरेंचं ठरलं का? दसरा मेळाव्यात युतीचं तोरण बांधणार का? शिवाजी पार्कवर राज ठाकरे विचारांचं सोनं लुटणार का?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत आज काय घडणार? ही रास तुमची तर नाही? वाचा गुरुवारचे भविष्य

Crime : बीडमधील माजी उपसरपंचाचा सोलापुरात संशयास्पद मृत्यू, तक्रारीत नर्तिकेचं नाव; नातेवाईकांना वेगळाच संशय

Toyota Cars Offers: अंबाबाईच्या नावानं चांगभलं! फक्त ९९ रुपयांच्या हप्त्यांमध्ये घरी आणा कार, अन् ५ फ्री सर्विससह ४ धमाकेदार फायदे

SCROLL FOR NEXT