brahmanand padalkar, miraj, sangli, gopichand padalkar saam tv
महाराष्ट्र

Miraj News : ब्रह्मानंद पडळकरांसह शंभर जणांवर गुन्हा; बंधूंच्या कृतीवर आमदार गाेपीचंद समाधानी (पाहा व्हिडिओ)

मिरज शहरातील घटना.

विजय पाटील

brahmanand padalkar latest marathi news : सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर (brahmanand padalkar) यांच्यासह शंभर जणांवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणे, लोकांना मारहाण केली, नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणे आदी (12 कलमांसह) गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. या प्रकरणात चार जेसीबी मशीन जप्त केल्याचेही पाेलिसांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी मध्यरात्री मिरजेतील (miraj) रस्त्या शेजारील हॉटेल आणि घरे जेसीबी लावून पाडली. मिरज शहरातील स्टँड जवळचे दोन हॉटेल, एक मेडिकलचे दुकान, ट्रॅव्हलचे ऑफिस, एक घर, पानाचे दुकान अशा सात मिळकती पाडल्या. त्यामुळे आज सकाळपासून मिरज स्टॅन्ड परिसरात नागरिकांची (citizens) गर्दी झाली.

ब्रह्मानंद पडळकरांसह शंभर जणांवर गुन्हा

पोलिसांची माेठी कुमक घटनास्थळी पाेहचली. पोलिसांनी घटनास्थळावरुन चार जेसीबी ताब्यात घेतले. स्थानिकांच्या तक्रारीनंतर ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह शंभर जणांवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली.

पालकमंत्री सुरेश खाडेंनी न्याय द्यावा

दरम्यान या प्रकारावरुन पडळकर गटावर आराेप हाेऊ लागले आहेत. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांनी पालकमंत्री आणि भाजपचे नेते सुरेश खाडे हे याच मतदारसंघातील आहेत. त्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

प्रशासनाला सहकार्य केले : आमदार गाेपीचंद पडळकर

माझ्या भावाने काेणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही अशी प्रतिक्रया आमदार गाेपीचंद पडळकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ते म्हणाले माझे बंधू यांनी अतिक्रमित जागा प्रशासनाला रिकामी करुन दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT