GOPICHAND PADALKAR CONTROVERSIAL REMARKS ON SHIVAJI MAHARAJ HISTORY saam tv
महाराष्ट्र

राजेंनी पन्हाळ्याच्या पायथ्याशी काढला अफजल खानचा कोथळा; गोपीचंद पडळकरांनी बदलला छत्रपतींचा इतिहास

Afzal Khan Killed Near Panhala? भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी एका सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितलयं...मात्र पडळकारांच्या विधानानंतर राजकीय टोलेबाजी कशी सुरु झाली? जयंत पाटलांनी सत्तेला कसं आव्हान दिलं? पडळकर नेमकं काय म्हणाले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ऐकलंत... इतिसाचं नवं संशोधन करून सभेत कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवणारे हे आहेत.... भाजप आमदार गोपीचंद पडळकर...सांगलीच्या बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यानिमित्त भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, हा कार्यक्रम राजकीय टोलेबाजीपेक्षा इतिहासातल्या दाखल्यांवरून रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे गाजला...भाषणादरम्यान बोलताना, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढला,' असं विधान गोपीचंद पडळकरांनी छातीठोकपणे केलं. इतकचं बोलून पडळकर थांबले नाहीत... तर शाहिस्ते खानाची बोटं राजेनी शनिवारवाड्यात छाटली, असं त्यांनी नवं संशोधनही केलंय...

विशेष म्हणजे पडळकारांच्या याचं सभेत त्यांचे कट्टर राजकीय विरोधत जयंत पाटीलही उपस्थित होते... त्यामुळे पडळकारांनी 'शत्रू कितीही मोठा असला तरी घाबरायचं नसतं, त्याच्या घरात घुसून कार्यक्रम करायचा असतो, असं म्हणत भाषणाला सुरुवात केली खरी, मात्र चुकीच्या दाखल्यांमुळे आपल्या विरोधकाच्या हातात आयतं कोलित देऊन बसले. आणि या संधीचा जयंत पाटलांनी कसा लाभ उठवला ते त्यांच्याच तोंडून ऐकूयात.....आणि पाटलांनी वाभाडे काढल्यानंतर पडळकरांनी काय अजब तर्क दिलाय तोही ऐका.

इतिहासाच्या आडून राजकीय टोलेबाजी पडळकारांच्या चांगलीच अंगलट आलीय. दम्यान जयंत पाटलांनीही सत्तेत आल्यावर चुण-चुणके म्हणत नव्या वादाला हात घातलाय...सत्ता येत जात राहते हे राजकारणाऱ्यांनी विसरायला नको. अन्यथा चुण-चुणके म्हणत राजकीय दुष्मनीला आपण खतपाणी घालतोय. जे महाराष्ट्राच्या मुळावर उठेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Easy Rangoli Designs For Diwali: दिवाळीसाठी सोप्या 5 रांगोळ्या, डिझाईन्स आत्ताच सेव्ह करून ठेवा

Government Scheme: ऐन दुष्काळात राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारची महत्त्वकांक्षी योजना बंद

बॅलेट पेपरवर निवडणुका अन् काँग्रेस शून्यावर; NDA किती जागांवर विजयी?

राजू शेट्टींना अटक होण्याची शक्यता; एकीकडे चर्चा सुरू असतानाच आंदोलनस्थळी पोलीस फौजफाटा वाढवला

Makyacha Chivda Recipe: पोह्यांचा चिवडा खाऊन कंटाळा आला असेल तर मक्याचा कुरकुरीत चिवडा बनवा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT