Gopalgad Fort in Ratnagiri at the center of a controversy after tourists were allegedly detained over picking mangoes. saam tv
महाराष्ट्र

रत्नागिरीतील शिवरायांचा किल्ला विकला? किल्ला शासनाचा की खासगी मालकीचा?

Gopalgad Fort Controversy Ratnagiri Tourists Detained Mango Row: रत्नागिरीतील ऐतिहासिक 'गोपाळगड' किल्ल्यावरून सध्या एक नवा वाद पेटलाय. गोपाळगडावरील फक्त दोन आंबे काढले म्हणून काही पर्यटकांना तिथे डांबून ठेवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. त्यामुळे शिवरायांचा किल्ला शासनाचा की खासगी मालकीचा? असा प्रश्न उपस्थित झालाय. पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

ऐकलंत ही व्यक्ती काय म्हणतेय... ऐतिहासिक वारसा असलेला गुहागर तालुक्यातील गोपाळगड किल्ला आपल्या मालकीचा असून सातबाऱ्यावर आपली नाव असल्याचा दावा हा व्यक्ती करताना या व्हिडिओत दिसतोय... गडावरील दोन आंबे उचलल्याच्या कारणावरुन पर्यटकांना किल्ल्यावर डांबल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय... छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गोपाळगडावर या पर्यटकासोबत नेमकं काय घडलंय ऐका...

दरम्यान, ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याचा नेमका वाद काय आहे पाहूयात...

1960 साली हा किल्ला अवघ्या तीनशे रुपयांत विक्री झाल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी तसेच शिवतेज फाउंडेशन यांनी याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. हा ऐतिहासिक वारसा शासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात आली होती. त्यानंतर 2025 मध्ये राज्य शासनाने गोपाळगड आपल्या ताब्यात घेतल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे हा वाद संपल्याचे मानले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतलं आहे...

या प्रकरणाचे आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. गोपाळगड किल्ला 25 तारखेनंतर योग्य निर्णय घेऊ, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिलीये. तर दुसरीकडे, पक्ष विकणारे किल्ल्यांचा काय विचार करणार, अशी टीका विरोधकांनी केलीये. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे गोपाळगड किल्ला प्रकरणानं नवं वळण घेतलंय. इतकंच नव्हे तर दोन आंबे उचलले म्हणून गुहागर मधील गोपाळगड किल्यावर पर्यटकांना डांबून ठेवण्याचा झालेल्या प्रयत्नानंतर स्थानिक आणि दुर्गप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच, आजही किल्ल्याच्या सातबारावर खासगी व्यक्तींची नावे कायम आहेत का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जाताहेत. त्यामुळे इतिहासाचा महत्त्वाचा वारसा असलेल्या गोपाळगडच्या मालकीबाबत आता प्रशासनाने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स 'टाय टाय फिस'; गिल-सुदर्शन-बटलर फ्लॉप

मी विद्यार्थी आहे' म्हणत प्रवाशांना गंडा; देशभरात फसवणूक करणारा आरोपी अटकेत

प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा

RCB vs GT IPL 2026 Final: आरसीबीसमोर गुजरातचं १५६ धावांचं आव्हान

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वारे आणि पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT