Cm Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus News: एसटी महामंडळाच्या कमाईत घसघशीत वाढ; CM शिंदेंच्या प्रयत्नांना यश, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

MSRTC Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना बस प्रवासात सवलत, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास मोफत केला. परिणामी अनेकांनी एसटीने प्रवास करण्याला पसंती दिली.

Satish Daud

MSRTC Latest Marathi News

एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात विविध उपाययोजना लागू केल्या. मे महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत प्रवास, तर महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दिली. परिणामी एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वसामान्य नागरिकांचे प्रवासाचे साधन म्हणून एसटीकडे (ST Bus) पाहिलं जाते. खेड्यापाड्यात पोहचण्यासाठी आजही अनेकजण एसटी प्रवासाला पसंती देतात. प्रवाशांच्या सेवेसाठी राज्यभरात दररोज १५ हजार ९२२ एसटी बसेस दिवसाला ५० लाख किलोमीटर धावतात.

या सेवेतून एसटीला दिवसागणिक २७ कोटी रुपये उत्पन्न मिळते. वर्षांला हे उत्पन्न ९ हजार ८५५ कोटी रुपयांच्या घरात जाते. मात्र ८७ हजार कर्मचारी व २५१ आगारांवर होणारा खर्च जवळपास तितकाच असल्याने एसटी महामंडळ नेहमीच तोट्यात असते.

मे महिन्यापर्यंत राज्यातील एकूण एसटी प्रवाशांची संख्या ९ कोटी ५० लाख इतकी होती. मे महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महिलांना बस प्रवासात सवलत, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास मोफत केला. परिणामी अनेकांनी एसटीने प्रवास करण्याला पसंती दिली.

सवलती दिल्याने ही संख्या १६ कोटी लाख झाली असून उत्पन्न ६०० कोटी ८२ लाखांवरून थेट ९१५ कोटी ८० लाख झाले आहे. याशिवाय विविध ३१ प्रकारच्या सवलतींसाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला १,१४४ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यामुळे एसटीची आर्थिक घडी काहीशी सुधारली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT