Shirdi News गोविंद सोळुंके
महाराष्ट्र

साई भक्तांसाठी आनंदाची बातमी; पुणे-शिर्डी-नागपूर विमानसेवा सुरू

नागपूर व पुणे विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून प्रवाशांसह साई भक्तांची मागणी होती त्यानुसार विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोविंद साळुंके

शिर्डी - साई भक्तांसह प्रवाशांना आनंदाची बातमी पुणे -शिर्डी-नागपूर विमानसेवा 18 फेब्रुवारी पासून सुरू होणार असल्याची माहिती शिर्डी विमानतळाची संचालक सुशील कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे. नागपूर व पुणे विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून प्रवाशांसह साई भक्तांची मागणी होती त्यानुसार विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे (Corona) मध्यंतरी 18 महिने शिर्डी विमानतळावर (Shirdi Airport) विमान सेवा बंद होती. आता विमान सेवा सुरळीत झाली आहे.

हे देखील पहा -

सध्या चार ठिकाणांसाठी विमान सेवा सुरू आहे. बंगलोरसाठी 2, दिल्लीसाठी 1, हैदराबाद 1, चेन्नई 1 अशा पाच विमान फेऱ्या आहेत. त्यात आता पुणे- शिर्डी - नागपूर अशी विमान सेवा सुरू होणार आहे. पुणे येथून येणारे विमान शिर्डी येथे येईल व तेच विमान नागपूरला जाणार आहे. त्याच दिवशी हे विमान नागपूरहून शिर्डीला येईल व तिथून पुणे येथे जाणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू ठेवण्याचा विमान कंपनीचा मानस आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

Diwali Lucky Rashi: दिवाळीत 'या' राशींची होणार चांदी, खिशा पैशांनी भरणार

१८६ महागड्या कार खरेदी करत २१ कोटी रुपयांची बचत, गुजरातमध्ये जैन समाजाने लढवली अजब शक्कल; प्रकरण काय?

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT