Private Granted School Job 
महाराष्ट्र

Private Granted School Job: खासगी अनुदानित शाळांसाठी खूशखबर; 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची होणार मेगा भरती

Private Granted School Job: आता बातमी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी. 2005 पासून बंद असलेली खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. मात्र ही भरती कधी होणार? किती पदांची भरती होणार? याविषयीचा हा विशेष रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्मचारी भरतीच्या हालचालींना वेग आलाय. त्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर करण्यात आलाय. त्यासाठी 33 हजार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र खासगी अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱी भरतीच्या प्रश्नाचं 2005 पासून भिजत घोंगडं पडलंय.

कर्मचारी भरतीचं भिजत घोंगडं

2005 पासून खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी भरती नाही

2019 मध्ये शासनाच्या संचमान्यतेला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने भरती स्थगित

2023 मध्ये न्यायालयाने स्थगिती उठवली

30 सप्टेंबर 2023 च्या पटसंख्येनुसार भरती होणार

वरिष्ठ, कनिष्ठ आणि मुख्य लिपिक, प्रयोगशाळा शिपाई आणि ग्रंथपालपदाचा समावेश

अत्यल्प किंवा विना पगार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

30 सप्टेंबर 2023 नुसार सरल पोर्टलवरील आधार व्हॅलिड पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे तब्बल 19 वर्षानंतर राज्यभरातील 10 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT