गेल्या आठवडाभरापासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या नाले दुथडी भरुन वाहत असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच नाशिककरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण आता १०० टक्के भरलं आहे. त्यामुळे नाशिककरांचा वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, गंगापूर धरण (Nashik News) १०० टक्के भरल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला (Godavari River) पूर आला असून जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरण प्रकल्पांपैकी अनेक धरणं १०० टक्के भरली आहेत. यामध्ये गंगापूर, दारणा, कश्यपी, आळंदी, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारीसह एकूण १७ धरणांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील ८ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी ही धरणे काठोकाठ भरली आहेत. याशिवाय पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर, पुनद ही धरणे देखील ओव्हर फ्लो झाली आहेत.
दुसरीकडे मनमाड शहराला आवर्तनाद्वारे पाणीपुरवठा करणारे पालखेड धरणातील पाणासाठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे मनमाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिंडोरी तालुक्यातील पावसामुळे करंजवण धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून, पालखेड धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे.
Edied by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.