Anand Sagar Shegaon
Anand Sagar Shegaon  Saam Tv
महाराष्ट्र

Anand Sagar Shegaon Reopen: गजानन महाराज भक्तांसाठी आनंदाची बातमी; पुन्हा सुरु होणार आनंद सागर

संजय जाधव

Buldhana News : राज्यातील मोठ देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकार कडून जमीन घेऊन त्यावर धार्मिक,अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकरवर उभारणी केली होती. (Latest Marathi News)

आनंद सागरमुळे शेगाव (Shegaon) हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक व पर्यटन वाढलं होत. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानाने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आनंद सागर हे दीड ते दोन महिन्यात भाविकांसाठी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन ते तीन महिन्यात आनंद सागर सुरू होऊ शकत. आता याठिकाणी बंद असलेल्या आनंद सागरला (Anand Sagar) दुरुस्त करून रंग रांगोटी करण्याची तयारी संस्थानाने सुरू केली आहे. (Buldhana News)

आगामी काही महिन्यात आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तशा आशयाचे संदेश देखील समाज माध्यमात फिरताना दिसत आहे. मात्र आता काही महिन्यातच आनंद सागर पुन्हा भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे. (Shegaon News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: 'मोदी-राज' सभेनंतर उद्धव ठाकरे सुपरफास्ट, मुंबईत एकाच दिवशी 4 सभांचा धडाका

Maharashtra Politics 2024 : 'अजित पवारांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत'; फडणवीसांची अजितदादांना जाहीर क्लीन चिट

Lord Shiva: महादेवाच्या पिंडावर थेंब-थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं?

South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या दोन गटात लढत

Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; गाझातील बॉम्ब हल्ल्यात झाले होते शहीद

SCROLL FOR NEXT