Maharashtra Farmer Saam Tv
महाराष्ट्र

Good News: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ऑनलाईन खरेदी करा खत, केंद्र सरकारने दिलं मोठं गिफ्ट

Farmers Now Buy Fertilizers Online: शेतकऱ्यांना आता खत खरेदीचे टेन्शन घेण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना आता ऑनलाईन खत खरेदी करता येणार आहे.

Priya More
  • शेतकऱ्यांना आता ऑनलाइन खत खरेदी करता येणार

  • केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खत खरेदीचे ॲप सुरू केले

  • वाशिममध्ये ऑनलाइन खत बुकिंगचा प्रायोगिक प्रकल्प

  • शेतकऱ्यांना मोबाईलवर खतसाठा तपासता येणार

मनोज जैयस्वाल, वाशिम

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठं गिफ्ट दिले आहे. आता शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी चिंता करण्याचे कारण नाही. कारण त्यांना ऑनलाईन खत खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारने खत खरेदी करण्यासाठी ॲपची निर्मिती केली आहे. १५ ऑगस्टपासून वाशिम जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे.

रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक ॲप आणलं असून त्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट ऑनलाईन खत खरेदी करता येणार आहे. याचा शुभारंभ १५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर वाशिम जिल्ह्यातून होणार आहे. आता ऑनलाईन खत खरेदी करता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केंद्र सरकारनं ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे ॲप तयार केलं आहे. १५ ऑगस्ट पासून प्रायोगिक तत्वावर वाशिम जिल्ह्यातून या ॲपची सुरुवात होणार आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खताची ऑनलाइन बुकिंग करता येणार असून जिल्ह्यातील खतसाठाही मोबाईलवरच तपासता येणार आहे. त्यामुळे खत वितरण अधिक सुलभ, पारदर्शक होऊन शेतकऱ्यांना योग्य वेळी खत मिळण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या ॲपची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात सध्या खत विक्रेत्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. वाशिमनंतर राज्यातील इतर सर्व ठिकाणी हे ॲप सुरू केले जाईल आणि त्याचा वापर करुन शेतकऱ्यांना खत खरेदी करता येईल. यामुळे त्यांचे टेन्शन कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण अपघात, भरधाव ट्रकची समोरून धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू

Glass Vs Plastic Tiffin Box: टिफिनसाठी प्लास्टिकचे की काचेचे कोणते डबे वापरावे?

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT