Chandrashekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

Good News: शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! शेत-रस्त्यांच्या आदेशाची ७ दिवसांत होणार अंमलबजावणी; सरकारचा मोठा निर्णय

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तहसीलदारांनी दिलेल्या शेतरस्ता आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयामुळे रस्त्याच्या वादात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Priya More

Summary -

  • तहसीलदारांनी दिलेल्या शेतरस्ता आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणी बंधनकारक

  • स्थळ पाहणी, पंचनामा आणि जिओ टॅग फोटो अनिवार्य

  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

  • या निर्णयामुळे रस्त्याच्या वादात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. वहिवाटीसाठी आणि सरबांधावरून ७ दिवसांत रस्ता मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेत-रस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेत अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. तहलीसदारांच्या आदेशानंतर स्थळ पाहणी जिओ-टॅग आणि फोटो बंधनकारक करण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे १०० टक्के निराकरण करा असे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत.

शेत-रस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची ७ दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळपाहणी पंचनामा आणि जिओ – टँग फोटोच्या आधारे करणे अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्याचा निर्णय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली "नागरिकांचे जीवनमान सुकर करणे" या विषयासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती. या समितीने नोंदवलेल्या निरिक्षणात अनेक प्रकरणांमध्ये वहिवाटीचा रस्ता मोकळा करणे किंवा सरबांधावरून रस्ता देण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे मत नोंदवले.

त्यानंतर आता महसूलमंत्री बावनकुळे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी सविस्तर दिशानिर्देश जारी करत मामलेदार न्यायालय अधिनियम किंवा महाराष्ट्र जमीन महसूल साहिंतेतर्गत हा निर्णय अधिकाऱ्यांना बंधनकारक केला आहे. त्यामुळे यापुढे ७ दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळ पाहणी पंचनामा आणि जिओ टॅग फोटोंच्या आधारे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

काय आहेत नवीन आदेश?

- जोपर्यंत मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ (कलम ५) किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (कलम १४३) अन्वये दिलेल्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत संबंधित प्रकरण दप्तरी दाखल (बंद) करण्यात येऊ नये, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.

- अधिकाऱ्याने अंतिम आदेश पारित केल्यानंतर, पुढील ७ दिवसांच्या आत त्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची खात्री करणे बंधनकारक आहे.

- ही खात्री केवळ तोंडी न करता, त्यासाठी रीतसर स्थळपाहणी पंचनामा करणे व जागेची जिओ-टॅग छायाचित्रे घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. हा पंचनामा आणि जिओ-टॅग फोटो संबंधित प्रकरणाच्या मूळ संचिकेमध्ये समाविष्ट करणे अनिवार्य असेल.

- या निर्देशांमुळे केवळ 'कागदी' आदेश देऊन अधिकाऱ्यांची जबाबदारी संपणार नाही. तर निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी आपापल्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ सूचना द्याव्यात व अंमलबजावणीची वेळोवेळी खातरजमा करणे आवश्यक आहे. यामुळे वर्षानुवर्षे रस्त्याच्या वादात अडकलेल्या हजारो नागरिकांना दिलासा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोमहर्षक अंतिम सामना! वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर दिल्लीचा ‘दबंग’ विजय; पुणेरी पलटनच्या संस्मरणीय हंगामाचा भावनिक शेवट

Powai Kidnapping Shock: पवईतील अपहरणाचा थरार, रोहितच्या एन्काऊंटरची इनसाईड स्टोरी

नेपाळ, बंगालनंतर आता 'या' देशातील सरकारविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर; आंदोलनादरम्यान ७०० जणांचा मृत्यू

'सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं,कर्जमाफी आश्वासनावर जरांगेंची टीका

Free Mobile Recharge Plan for One Year: मोदींकडून वर्षभर मोबाईल फ्री रिचार्ज? 1 GB डेटाही क्षुल्लक किंमतीत मिळणार?

SCROLL FOR NEXT