Good news for farmers, insurance companies have approved crop insurance for 35 lakhs farmers maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Farmers Pik Vima: बळीराजाची यंदाची दिवाळी होणार गोड; राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीकविमा मंजूर

Pik Vima: राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे. त्यामुळे पीकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Satish Daud

Farmers Crop Insurance Approved

दुष्काळ आणि दुबारपेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीक विमा मंजूर झाला आहे. त्यामुळे पीकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

एकट्या बीड जिल्ह्यात ७ लाख ७० हजार अर्जदारांसाठी २४१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात उशीराने दाखल झालेला मान्सून आणि त्यात सप्टेंबर महिन्यात पावसाने मारलेली दडी, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं होतं. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेली पिके डोळ्यादेखत करपून जात असल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले होते.

सरकारने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, तसेच पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील १५ जिल्हाधिकाऱ्यांनी भरपाईसंदर्भात अधिसूचना काढली.

पण, पीकविमा कंपनीने सरसकट विमा देण्यास हरकत घेतली. इतकंच नाही तर पीकविमा कंपन्यांनी आधी विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसकट विमा देण्यास हरकतीचे अपील केले होते. हे दोन्हीही अपील संबंधित यंत्रणांनी फेटाळून लावले.

यानंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विमा कंपन्यांची राज्यव्यापी बैठक घेऊन सरसकट अग्रीम विमा देण्याबाबत भूमिका घेतली. दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळाला नाही, तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही, अशी कृषीमंत्र्यांनी जाहीर केली होती.

अखेर भारतीय पीकविमा कंपनीने आपले आक्षेप मागे घेतले असून, राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांचा अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी १७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT