Nitin Gadkari Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबादकरांसाठी खूषखबर; चिकलठाणा - वाळूज उड्डाणपूल मंजूर

या ओव्हर ब्रिज मुळे शेंद्रा औद्योगिक पंचतारांकित वसाहत आणि वाळूज या दोन औद्योगिक वसाहतींना एकत्रित मोठा फायदा होणार आहे.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - शहरात आता चिकलठाणा ते वाळूज या दरम्यान एकच उड्डाणपूल होणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडून डीपीआरसाठी काम सुरू करण्यात आले आहे. या उड्डाणपुलामुळे औरंगाबाद (Aurangabad) शहरातील होणारी वाहतूक आणि दळणवळणाचे अडचण दूर होणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिल्लीमध्ये (Delhi) बैठक घेतली. या बैठकीमध्ये औरंगाबाद शहरातील चिकलठाणा ते वाळूज सरसकट ओव्हर ब्रिज, नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्याचे रुंदीकरण करणे ,औरंगाबाद वैजापूर शिर्डी मार्गाचे दहा मीटर पर्यंत रुंदीकरण आणि दुहेरीकरण, कन्नड औट्रम घाटातील धुळे-सोलापुर महामार्गाचे रुंदीकरण आणि काही ठिकाणी बोगदे करण्या बाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.

हे देखील पहा -

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. औरंगाबाद शहरातील वाढती लोकसंख्या आणि रहदारीची कोंडी लक्षात घेता, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवर चिकलठाणा ते वाळुज पर्यंत सरसकट ओव्हर ब्रिज टाकण्यात येणार आहे. त्यासंदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्यासाठी कन्सल्टंट नियुक्ती करण्यासंदर्भात वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आदेश दिले आहे.

या ओव्हर ब्रिज मुळे शेंद्रा औद्योगिक पंचतारांकित वसाहत आणि वाळूज या दोन औद्योगिक वसाहतींना एकत्रित मोठा फायदा होणार आहे. या ओव्हर ब्रिज मुळे दोन औद्योगिक वसाहतीं मधील उद्योजकांना देखील दळणवळण सोपे होईल, आणि जालना रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही सुटणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT