Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : ९५ लक्ष खर्चूनही जल जीवन मिशन योजना फेल; भर उन्हात महिलांची पाण्यासाठी शेतशिवारात भटकंती

Gondia News : गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर जलजीवन मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत पालेवाडा या गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महीलांची शेत शिवारातील भटकंती शासनाच्या विविध पाणी योजनांचा समाचार घेण्यासारखी आहे. जिल्ह्यात ९५ लाख खर्च करून केलेली जल जीवन मिशन योजना फेल ठरल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

गोंदिया (Gondia) जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर जलजीवन मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत पालेवाडा या गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेने ज्या ठिकाणी पाण्याच्या मुख्य स्त्रोतासाठी विहीर खोदली ती जागा चुकीची निवडल्याने जानेवारी महिन्यातच तेथील पाणी (Water Scarcity) आटले. यासह गावातील बोरवेल देखील कोरड्या पडल्याने आता येथील महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

शेत- शिवारातून महिलांना पाणी आणावे लागत आहे. तर चुकीच्या नियोजनामुळे ९५ लक्ष खर्च करून देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नसेल तर शासनाच्या योजना खरचं नागरिकांसाठी राबविण्यात येतात का? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर पालेवाडा गावापासून अवघ्या ५ किमी अंतरावर (Zilha Parishad) असलेल्या कलपाथरी मध्यम प्रकल्पावर पाण्याची योजना कार्यान्वीत करून पालेवाडा वासियांची तहान भागवावी; अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

SCROLL FOR NEXT