electric shock Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : गोंदियात होर्डींग काढताना भयंकर घटना; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Gondia News : गोंदिया शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, व्यापारी वर्ग, राजकारणी यांचे होर्डिंग नगरपरिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लावले जातात

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: शहरातील विद्युत खांबांवर अनधिकृत जाहिरातींचे होर्डिंग लावले गेले असून. हे होर्डिंग काढत असताना एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना गोंदिया शहरात घडली आहे. होर्डिंग काढत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला.  

गोंदिया (Gondia) शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिर चौपाटी परिसरात सदरची घटना घडली असून यात छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोंदिया शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, व्यापारी वर्ग, राजकारणी यांचे होर्डिंग नगरपरिषदेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे लावले जातात. यासंदर्भात नगरपरिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत मुख्याधिकाऱ्यांसमोर सामाजिक संघटनांनी आवाज उठवला. 

अनधिकृतपणे होर्डिंग लावल्याबाबत नगरपालिका कोणतीही कार्यवाही करत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात दुर्दैवी घटना घडली असून ज्यामध्ये छोटा गोंदिया येथील आकाश नागरीकर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. आकाश हा (Electric Shock) विद्युत खांबावरील होर्डिंग काढत असताना त्याला विद्युत करंट लागून फेकला गेला. यानंतर त्याला केटीएस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा कायम, गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा

Sun Tan Removal Tips: 3 दिवसात गायब होईल चेहऱ्यावरचं टॅनिंग, हा देसी उपाय नक्की करून पाहा

रूपाली चाकणकरांचे रायगड कनेक्शननंतर राज्यात पुन्हा खळबळ; नेमके प्रकरण काय?

Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

Political News : खासदार होताच आमदारकीचा राजीनामा दिला, मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार?

SCROLL FOR NEXT