Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: महिला मजुराच्या ट्रॅक्टरवरुन पडल्याने मृत्यु; रस्ता बांधकामाला जाताना घटना

महिला मजुराच्या ट्रॅक्टरवरुन पडल्याने मृत्यु; रस्ता बांधकामाला जाताना घटना

अभिजीत घोरमारे

गोंदिया : रस्ता बांधकामाला जाणाऱ्या महिला मजुराच्या ट्रॅक्टरवरुन पडल्याने डोक्याला मार लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना (Gondia) गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्याच्या दवनिवाडा येथे घडली आहे. (Live Marathi News)

पुष्पा रमेश बागड़े (वय ४०) असे मृतक महिलेचे नाव आहे. प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेअंतर्गत दवनिवाडा- कारुटोला रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. आज या (Accident) बांधकामाला १० मजूर ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसून जात होते. या दरम्‍यान दवनिवाडा येथे भरधाव ट्रॅक्टरवरुन अचानक तोल गेल्याने पुष्पा सरळ डोक्याच्या भारावर रस्त्यावर पडल्या. त्यातच त्यांच्या जागीच मृत्यु झाला.

ट्रॅक्‍टर चालकावर गुन्‍हा

अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच एकच गर्दी घटनास्थळी जमा होऊन तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्‍थी करत प्रकरण शांत केले आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death: प्रसिद्ध गायकाचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; संगीत विश्वात शोककळा

Maharashtra News Live Update: पेपर फुटी प्रकरणानंतर नीट परीक्षेच्या केंद्रावर परीक्षेवेळी आता पोलिसांची नजर

६ फुटीर खासदारांची काय डील झाली? कोणाला मिळणार मंत्रिपद? संजय राऊतांचा धक्कादायक दावा

टपरीसारखा चहा घरी बनत नाही? मग टाका हा 1 स्वादिष्ट मसाला, न पिणारेही चहा पितील

Gold Rate News: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी पडझड; भाव घसरल्याने बाजारात उलटफेर, 24K, 22K,18K तोळ्याची किंमत किती?

SCROLL FOR NEXT