Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : लाखो रुपयांचा गांजा पकडला; १२० किलो गांजासह दोघे ताब्यात

Gondia News : देवरी पोलिसांनी शिरपुर/बांध येथिल सिमा शुल्क तपासणी नाक्यावर नाकेबंदी केली. याठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी करून वाहन पुढे सोडण्यात येत होते.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: रायपुरकडून नागपुरकडे जाणाऱ्या वाहनामधून वाहतूक करण्यात येणार गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलिसांनी रात्री शिरपुर बांध येथील सिमाशुल्क तपासणी नाक्याजवळ सदरची कारवाई केली असून यात ओल्या गांज्याचे २४ पाकीट जप्त केले आहे. 

परराज्यातून गांजाची (gondia) तस्करी होत असल्याचे सदरच्या कारवाईवरून समोर आले आहे. देवरी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून रायपुरकडुन नागपुरकडे एका चार चाकी वाहनात गांजा वाहतुक होत आहे. त्या आधारावर देवरी (Police) पोलिसांनी शिरपुर/बांध येथिल सिमा शुल्क तपासणी नाक्यावर नाकेबंदी केली. याठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी करून वाहन पुढे सोडण्यात येत होते. 

दरम्यान, रात्रीच्या सुमारास रायपुरमार्गे नागपुरकडे येत असलेल्या कार चालकाने नाकेबंदी दरम्यान वाहन जोरात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पडून जाण्याचा प्रयत्न हाणून पडला. पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेत गाडीची झडती घेतली. यात गाडीच्या डिक्कीत गांजाची २४ पाकिटे आढळून आली. एक पाकीट ५ किलो वजन एकूण १२० किलो ओला गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, कार, मोबाइल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT