Gondia Accident Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Accident: गोंदियामध्ये हिट अँड रन, भरधाव ट्रकने १०० मीटरपर्यंत फरफटत नेले, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

Gondia Teacher Died After Accident: गोंदिया शहरातील रामनगर पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या राणी अवंतीबाई चौकात आज सकाळी हा अपघात झाला.

Priya More

शुभम देशमुख, गोंदिया

गोंदियामध्ये हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. भरधाव ट्रकने शिक्षिकेला धडक देत १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. या अपघातामध्ये शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. गोंदियातील राणी अवंतीबाई चौकात हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. पण पोलिसांनी त्याला काही तासांतच अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया शहरातील रामनगर पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या राणी अवंतीबाई चौकात आज सकाळी हा अपघात झाला. अल्वीना जेम्स लुईस असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. अंभोरा येथील शाळेमध्ये अल्वीना शिक्षिका होत्या. नेहमीप्रमाणे त्या शाळेच्या दिशेने निघाल्या होत्या. त्याचवेळी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या अल्वीना यांना भरधाव ट्रकने धडक दिली.

अल्विना यांना भरधाव ट्रकने चिरडले आणि १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली आल्यामुळे अल्वीना यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. पण गोंदिया पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT