Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News: अवैधरित्या गांजाची साठवणूक; पोलिसांच्‍या करवाईत मुद्देमाल जप्‍त

अवैधरित्या गांजाची साठवणूक; पोलिसांच्‍या करवाईत मुद्देमाल जप्‍त

अभिजीत घोरमारे

गोंदिया : अवैधरित्या गांजाची साठवणूक करून विक्री करीता बाळगले होते. या प्रकरणी ३३ किलो ६८८ ग्रॅम गांजासह एकास अटक केली आहे. (Gondia News) त्‍याकडून ६ लाख ७३ हजार ७६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Live Marathi News)

गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर धाडी घालून कारवाई करून सर्व अवैध धंदे नष्ट करण्याचे, तसेच अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक यांनी दिले आहे. या अनुषंगाने गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्‍यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.

घरात अवैधरित्या साठवणूक

मिळालेल्‍या माहितीनुसार खुशाल उर्फ पप्पु अगडे (रा. श्रीनगर, गोंदिया) याने विक्री करीता अवैधरित्या गांजाचा साठा राकेशसिंग उर्फ बंटी खतवार (ठाकूर) याच्या घरात अवैधरित्या गांजा साठवणूक करुन ठेवलेला आहे. स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत खरातून ३३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यांची एकूण किंमत ६ लाख ७३ हजार ७६० रूपये इतकी असून एक आरोपीला अटक करण्यात आली तर एक अरोपी फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीच्या कुपवाड शहरासह तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसाची दमदार हजेरी

Mumbai Crime: दारू पार्टीत चेष्टा केल्याचा राग डोक्यात गेला, झोपलेल्या मित्राला जागीच संपवलं

शिंदेंनी डाव टाकला; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने असंख्य कार्यकर्त्यांसह हाती घेतलं धनुष्यबाण

Vastu Shastra: दुसऱ्यांचे कपडे आणि चप्पल घातल्याने काय होते?

सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?

SCROLL FOR NEXT