Viral Photo Collector Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Viral Photo Collector: फोटो एडिट करून झाला नरसिंगपूरचा जिल्हाधिकारी; स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणाचा प्रताप

Gondia News फोटो एडिट करून झाला नरसिंगपूरचा जिल्हाधिकारी; स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणाचा प्रताप

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : आयएएस अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणाला जबलपूर पोलिसांनी (Police) पकडले आहे. या तरुणाने आपण नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी असल्याचा दावा केला होता. (Gondia) त्याने पदभार स्वीकारताना फोटोही पोस्ट केला होता. त्यामुळे सध्या हे प्रकरण चर्चेत आले आहे. (Breaking Marathi News)

संबंधित तरुणाचे फोटो व्हायरल होताच त्याची माहिती नरसिंगपूरचे जिल्हाधिकारी रिजू बाफना यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तपास केला असता तरुणाचा बनाव पकडला गेला. चौकशी दरम्यान, आरोपीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत फोटो काढत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याचे समोर आले आहे. राहुल गिरी असे आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्रातील गोंदिया येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमध्ये अधिकाऱ्यांसह अनेक राजकारण्यांचे फोटोही सापडले आहेत. 

स्वप्न पूर्ण करण्यासाठी..  

एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून तो त्यांच्यासोबत आपली छायाचित्रे काढत असे. राहुल बीएससी पास आहे. आरोपीला (Social Media) आयएएस व्हायचे होते. मात्र त्याने तितके शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे तो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोटो एडिट करून आयएएस झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT