Police
Police Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Crime News कॉपी केली म्हणून पैसे द्या...; गोंदियातलं कॉपी प्रकरण आहे तरी काय?

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत घोरमारे

Copy in Exam : राज्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्यानंतर कॉपीच्या अनेक घटना समोर आल्या. अशात आता या गोष्टीचा फायदा घेत काही भामटे यात आपला हात साफ करताना दिसत आहेत. गोंदियामध्ये असाच एक खळबळजनक प्रकार समोर आलाय. यामध्ये दोन व्यक्तींनी व्हिडिओ तयार करून कॉपी केली म्हणून एका महाविद्यालयाकडून खंडणी मागितली आहे. या दोन्ही भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Gondia News)

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्हाच्या रावणवाडी पोलिस ठाणे हद्दीत ग्राम दासगाव येथील अनुसया पशिने हायस्कूल आणि अर्चना पशिने आर्ट्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. दोन व्यक्तींनी या सेंटरवर कॉपी करत पेपर लिहिला जात असल्याचा व्हिडिओ तयार केला. तसेच २० हजारांची खंडणी मागण्यास सुरूवात केली. महेंद्र लिल्हारे (३५, रा. इंगळे चौक गोंदिया) आणि दिनेश पटले (३६.रा.चिंचगाव, गोरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

बारावीचा इंग्रजीचा पेपर सुरू असताना आरोपी महेंद्र लिल्हारे व दिनेश पटले हे दोघेही अनुसया पशिने कॉलेज येथे जाऊन तिथल्या इमारतीवर चढले. या कॉलेजमध्ये कॉपी केली जाते असा व्हिडिओ तयार करून प्राचार्यांना २० हजार रुपयांची मागणी केली. या घटने संदर्भात प्राचार्या वंदना परसराम बिसेन (५२,रा. दुर्गा भवन,साई मंदिर रोड,सिव्हिल लाईन,गोंदिया)हा सर्वप्रकार लक्षात येताच प्राचार्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आरोपी महेंद्र लिल्हारे आणि दिनेश पटले या दोघांवर कलम ३८५,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

कॉपी बहाद्दरांकडून केंद्र संचालकासह, परीवेक्षकांना जीवे मारण्याची धमकी

जालन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान सेवलीतील जिल्हा परिषद शाळेच्या (ZP School) केंद्रावर काॅपी बहाद्दरांनी आपल्या पाल्याला आणि मित्रांना कॉपी करू द्या अन्यथा तुम्हाला जिवे मारू अशा धमक्या (Jalna News) दिले. जर पोलिसांकडे किंवा कुठं तक्रार केल्यास तुम्हला सोडणार नाही; अशा स्वरूपाच्या धमक्या देत दगडफेक केल्याचा ही प्रकार झाल्याची घटना घडली.

जालना तालुक्यातील सेवली येथील सेंटर हे कॉपी सेंंटर असल्याचे परिचित आहे. या केंद्रावर जवळपास ११ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या केंद्रावर जिल्हाधिकारी यांनी पहिल्याच पेपरला १६ विद्यार्थ्यांना रसतिकिट केल्यानंतर या सेंटरवरील कॉपीमुक्त परीक्षा घेण्याची सक्त ताकीद दिली. यानंतर या सेंटरवर कार्यरत असलेल्या शिक्षकांनी कॉपीमुक्त अभियान राबविण्यास सुरवात केली. दरम्यान परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत आलेल्या नातेवाईकांनी बुधवारी परीक्षा केंद्रावर राडा घालत दगडफेक करत काॅपी चालू द्या, अन्‍यथा जीवे मारु अशी धमकी शिक्षकांना दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

Maharashtra Politics 2024 : 'ठाकरेंकडून संभाजीराजे छत्रपतींचा अपमान'; व्हिडीओ दाखवून उदय सामंतांचा खळबळजनक दावा

CSK vs PBKS : पंजाबने चेन्नईला सलग चौथ्यांदा नमवलं; पंजाबचा ७ गडी राखून विजय

Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

Rupali Ganguly: परी म्हणू की अप्सरा; रूपालीचे आउटफिट पाहून पडाल प्रेमात

SCROLL FOR NEXT