Gondia Crime News Saam tv
महाराष्ट्र

Gondia Crime News: शेतीच्या वादातून पुतण्याचे भयंकर कृत्य..गळा दाबून केली काकूची हत्या; परिसरात खळबळ

Crime News In Marathi: पोलिसांनी प्रथम महिलेच्या आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे उघडकीस आले.

Gangappa Pujari

शुभम देशमुख...

Gondia Crime News: शेतीच्या वादातून पुतण्याने काकूची हत्या केल्याची घटना केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्याच्या देवरी गोंदी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी प्रथम महिलेच्या आकस्मित मृत्यूची नोंद केली होती.

मात्र शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, देवला किसन गेडाम रा.देवरी गोंदी (56) या महिलेचा मृतदेह 2 ऑगस्टला देवरी किटाळी रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. सरपंच उपेंद्र शेंडे यांच्या फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात वैद्यकीय टीमच्या तपासात महिलेची हत्या झालाचा संशय बळावला.

पोलिस निरीक्षक विरसेन चहांडे यांनी घटनास्थळ गाठले असता घटनास्थळी काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यानुसार पालांदूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी पुतण्या स्वप्नील अभिमन गेडाम (31) रा. किटाळी याला अटक केली.

शेतीच्या वादातून हत्या...

दरम्यान, मृतक देवलाबाई यांच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर सासरकडील सामूहिक शेतजमिनीत देवलाबाईचे नाव सातबारावर दर्ज करण्यात आले होते या सामूहिक शेतीवरून देवला बाईचे सासरे व त्यांचा चुलत भाऊ अभिमन जयराम गेडाम यांच्यात जुनावाद होता.

घटनेच्या दिवशी आरोपी स्वप्निल आणि त्याच्या काकूंमध्ये शेतीच्या वादावरुन कडाक्याचे भांडण झाले. राग अनावर होऊन स्वप्नीलने तिला मारहाण करून जमिनीवर पाडले आणि तिचे नाक तोंड व गळा दाबून हत्या केली असे तपासात निष्पन्न झाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT