Gondia Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Gondia Bribe Case : लाच मागणारा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; थकीत बिलावर स्वाक्षरीसाठी मागितली १० टक्के रक्कम

Gondia News : नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे फरकाचे ६ लाख ७ हजार ३२० रूपयाचे बिल तयार करण्यात आले.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कनिष्ठ सहाय्यकाच्या थकीत भत्याच्या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याने लाच मागितली. लाचेची रक्कम स्वीकारताना वैद्यकीय अधिकाऱ्यास एसीबीने ताब्यात घेतले आहे. हा प्रकार गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे घडला आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव ता;तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबर मडावी (वय ४४) यांनी तक्रारकर्ता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहे. तक्रारकर्त्याचे नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे फरकाचे ६ लाख ७ हजार ३२० रूपयाचे बिल तयार करण्यात आले. बाराभाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्यात कार्यरत डॉ. अंबर मडावी यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांच्या बिलावर सही करण्यासाठी डॉ. अंबर यांनी १० टक्के प्रमाणे ६० हजार रूपये लाचेची (Bribe) मागणी केली.

गुन्हा दाखल 

दरम्यान तक्रारकर्त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने (ACB) लाचलुचपत विभाग गोंदियाकडे तक्रार केली. ४८ हजार रूपयाची लाच स्वाकारण्याची तयारी दर्शविली होती. मात्र तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत विभागाने डॉ. अंबर मडावी याला ताब्यात घेवून अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात लाचलुचपत कायद्यान्वये नुसार गुन्हा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT