Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : मोटार सायकल चोरीतील २ गुन्हेगार ताब्यात; ५ मोटारसायकली जप्त

Gondia News : मोटार सायकल चोरीतील २ गुन्हेगार ताब्यात; ५ मोटारसायकली जप्त

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या प्रकरणांचा पोलिसांकडून शोध सुरु असून (Police) पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन (Gondia) गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. (Maharashtra News)

गुन्हेगारांचा पोलीस ठाणे स्तरावर शोध मोहीम हाती घेवून गुन्हेगारांना जेरबंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोरेगाव येथील पोलीस पथक गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत राजकुमार सयाम (वय १९, रा. बिरडीटोला) हा चोरीच्या गुन्ह्यातील मोटर सायकल मौजे चूलोद येथे विकणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल मिळून आली. अधिक तपास केला असता दोन नंबर नसलेल्या मोटरसायकल मिळून आल्या. 

दुसऱ्या साथीदाराचे नावही सांगितले 

आरोपीने गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले इतर साथीदार साहिल उमेंन्द्र बिसेन (वय १९) याचे नाव सांगितले. त्यावरून आरोपीचे राहते गावी जाऊन शोध घेतला असता त्याचे ताब्यातून वाहन मिळून आले. तसेच मौजा सटवा डव्वा येथुन नंबर नसलेली मोटरसायकल देखील मिळून आली. अश्या एकूण पाच मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या असून नंबर नसलेल्या मोटर सायकलचे इंजिन व चेसीस नंबर वरून पुढील माहिती घेऊन गोरेगाव पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT