Thackeray Group and Ncp Corporator Join Shiv Sena Saam Tv
महाराष्ट्र

Thackeray Group and Ncp Corporator Join Shiv Sena: गोंदियात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला धक्का! 12 विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत केला प्रवेश

Gondia News: गोंदियात ठाकरे गटाला धक्का! 12 विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत केला प्रवेश

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

Thackeray Group and Ncp Corporator Join Shiv Sena: गोंदिया जिल्ह्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. येथील अर्जुनी मोरगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ नगराध्यक्ष आणि तब्बल १२ नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर ठाकरे गटाच्या ४ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाचे बांधकाम सभापती आणि विद्यमान नगरसेवक महेंद्र वंजारी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदासंघाचे राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ सुगत चद्रिकापुरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सडक अर्जुनी नगर पंचायत मधील विद्यमान नगराध्यक्ष तेजराम मडावी यांचे सहित १२ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.  (Latest Marathi News)

तसेच अर्जुनी मोरगाव नगरपंचायत विद्यमान नगर अध्यक्ष मंजुषा बरसागडे यांचे सहित ३ नगरसेवकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही मतदारसंघातील विकासासाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे डॉ सुगत चंद्रिकापुरे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT