arrest 
महाराष्ट्र

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास संपवले; जिम मालकासह दाेघे अटकेत

अभिजीत घोरमारे

गोंदिया : व्यावसायिक स्पर्धा वाढेल या भितीपाेटी गणेशनगरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक अशोक बाबूलाल कौशिक (वय ४५) यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अवघ्या काही तासांत गोंदिया पोलिसांनी चिंटू शर्मा, दीपक भुते, सतीश बनकर या तीन संशयित आराेपींना अटक arrest केली. या तिन्ही संशयितांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला असून त्याची फिर्याद काैशिक यांच्या पत्नीने नाेंदवली आहे. दरम्यान न्यायालयाने तिघांना २७ पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

व्यावसायिक स्पर्धी हे खूनाचे मुख्य कारण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चिंटूचे सर्कस मैदानाजवळ एक व्यायामशाळा (जिम) आहे. अशोकचा वाहतूक व्यवसाय याच परिसरात आहे. त्याची चिंटूशी चांगली ओळख होती. ते नेहमी एकमेकांना भेटायचे. दरम्यान अशोकने या परिसरात एक अद्यायवत व्यायामशाळा सुरू करण्याचा मनाेदय चिंटूकडे बाेलून दाखविला हाेता.

यामुळे आपला व्यवसाय बुडणार अशी भिती चिंटू शर्माला वाटू लागली. त्याबाबत जिममधील सहकारी दीपक भुते याच्याशी बाेलून दाखविली. त्यानंतर पाच लाख रुपये देऊन कौशिक यांची हत्या करण्याची सुपारी चिंटूने सतीश बनकर याला दिली. त्यासाठी दाेन लाख २० हजारांची रक्कम बनकर यास देण्यात आली. बनकर याच्या मदतीस चिंटूच्या व्यायामशाळेत कार्यरत असणारा दिपक भुते हा आला.

दाेन दिवसांपुर्वी (ता.२१) सकाळच्या प्रहरी बनकर आणि भुते दोघेही प्लॅननुसार सर्कस मैदानावर पोहोचले. अशोक काैशिक हे नेहमी प्रमाणे सकाळी बाहेर फिरायला जात ही गाेष्ट या दाेघांना माहित हाेती. अशोकला त्यांनी दुचाकीवरुन जाताना पाहिले. दोघांनी त्याचा पाठलाग करुन डोक्यात गोळी झाडली. या घटनेत अशाेकचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, डीवायएसपी जगदीश पांडे, ठाणेदार महेश बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी पोहोचली. संशयित आरोपींच्या शोधासाठी विविध पोलीस पथके तयार करण्यात आली.

घटनास्थळी आणि काैशिक कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पाेलिसांनी संशयितांचा माग काढला. तिन्ही संशयितांना एक एक करून अटक केली. अशाेक यांच्या पत्नी रेखा कौशिक यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल नाेंद केला. संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता २७ पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT