Gondia Crime News Saam tv
महाराष्ट्र

Gondia Crime News: नकली सोने विकणाऱ्या तरुणाची हत्या; दोघांवर प्राणघातक हल्ला, पाच जणांना अटक

Gondia News : नकली सोने विकणाऱ्या तरुणाची हत्या; दोघांवर प्राणघातक हल्ला, पाच जणांना अटक

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: नकली वस्तूंची विक्री करून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शिवाय खरे सोन्याचे (Gold) दागिने असल्याचे भासवत नकली दागिने विक्री करत आहेत. असाच प्रकार गोंदिया (Gondia) जिल्ह्यात समोर आला असून यातून नकली सोने विक्री करणाऱ्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

गोंदिया जिल्ह्यात नकली साहित्य विक्री करणारे गावोगावी फिरत आहेत. यातच तिन लोक सोन्याचे नकली झुंबर घेउन गावात फिरत होते. याची माहिती गावकऱ्याना मिळाली होती. त्यासाठी गावकऱ्यांनी तिघांना अडवत आम्हाला नकली सोने विक्री करून फसवणूक करता; असे म्हणत तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एकजण ठार झाला असून, दोघे गंभीर (Crime News) जखमी झाले आहेत. 

गावातील पाच जण ताब्यात 

सदर घटना डांगोली येथे घडली. किशोर चुन्नीलाल राठौर (वय ३०, रा. गोंडीटोला, कटंगीकला) असे मृताचे नाव आहे. तर संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८, रा. गोंडीटोला) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT