Gondia Rape Case News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर अपहरण करून डांबून ठेवलं; लग्न करण्यासाठी तरुणाचं संतापजनक कृत्य

Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • लग्नासाठी नकार दिल्यामुळे आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले

  • मुलीवर अत्याचार करून तिला शाळेत बांधून ठेवले

  • दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी मुलीची सुटका केली

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला

शुभम देशमुख, गोंदिया

Gondia Rape Case News गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून एका 21 वर्षीय तरुणाने गावातीलच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची गंभीर घटना दवनीवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुमित ऊईके याच्याविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच गावातील रहिवासी असून त्यांच्यात मागील दोन वर्षांपासून ओळख होती. मात्र, तीन महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतरही तो तिचा सतत छळ करत होता. घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिचे अपहरण केले.

यानंतर आरोपीने तिला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका खोलीत नेले. तिथे “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जिवे मारीन,” अशी धमकी देत तिच्यावर दबाव टाकला. मात्र, पीडितेने ठामपणे नकार दिल्यानंतर आरोपीने अमानुष कृत्य केले. त्याने तिचे तोंड, हात आणि पाय ओढणीने घट्ट बांधले आणि तिला त्या खोलीतच बंद करून स्वतः तेथून पसार झाला.

दुसऱ्या दिवशी शाळा उघडण्यासाठी कर्मचारी आले असता हा प्रकार समोर आला. मुलगी बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तिची तातडीने सुटका करण्यात आली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात दवनीवाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीचा शोध घेतला आणि रात्री उशिरा त्याला अटक केली. तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांनी या घटनेची पुष्टी केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : मीठ अन्...; 'हे' ५ पदार्थ हाय BP च्या रुग्णांसाठी खूपच घातक

शिंदेंच्या आमदाराची गुंडगिरी कधी थांबणार? छत्रपती शिवरायांचा आदर करताना जीभ घसरली, ऑडिओ क्लिप व्हायरल

Nashik Crime: खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचं कांड, विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

Mumbai Metro 5A: आनंदाची बातमी! लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, उल्हासनगरपर्यंत धावणार 5A मेट्रो; कधीपर्यंत होणार सुरू?

Maharashtra News Live Update: नाशिकरोडमध्ये धक्कादायक प्रकार, तक्रार न घेतल्याच्या रागातून युवकाचा टोकाचा निर्णय

SCROLL FOR NEXT