Gulabrao Patil News Saam TV
महाराष्ट्र

Gulabrao Patil News : गोंडगाव अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon Crime News : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला.

साम टिव्ही ब्युरो

Jalgaon News : गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याची अमानवी घटना ३० जुलै रोजी घडली होती. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याने घटनेची कबुलीही दिली आहे.

या घटनेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी बालिकेच्या कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता‌. आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गोंडगाव येथे पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, स्थानिक गावकरी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पीडितेच्या कुटुंबाचे शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्यात येईल. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन बांधिल आहे. आठ दिवसांच्या आत या घटनेत चार्जशीट दाखल करत हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल.

शासन या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या कुटुंबास लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभही देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

SCROLL FOR NEXT