Gold And Silver Price Drop In Jalgaon Today saam tv
महाराष्ट्र

सोनं ३ हजारांनी स्वस्त, चांदी ७ हजारांनी घसरली, आठवडाभरात मार्केट जाम, सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Gold And Silver Price Drop In Jalgaon Today: जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याचे दर 3 हजारांनी तर चांदीचे 7 हजारांनी कमी झाले आहेत.

Omkar Sonawane

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव: गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीचे दर आता कोसळले आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मार्केट स्थिर झाल्याचा परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर मजबूत झाल्याने आणि जागतिक मार्केटमध्ये स्थिरता आल्याने मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्या आहेत. आज एकाच दिवसात सोन्याचे दर 1700 रुपयांनी, तर चांदीचे दर 7 हजार रुपयांनी कोसळले आहेत. सद्यस्थितीत जळगावात जीएसटीसह सोन्याचा दर 1,52,300 रुपये आणि चांदीचा दर 2,51,500 रुपयांवर पोहोचला आहे.

दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी सुवर्णसंधी असली तरी ही स्थिति फार काळ टिकणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मार्केटमध्ये सध्या घसरण दिसत असली तरी आगामी काळात सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जलगावचे सुवर्ण व्यावसायिक गिरीश डेरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान सध्या लग्न सराई सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात सोने चांदी खरेदीचे प्रमाण वाढले आहे. आज भाव कोसळल्याने बऱ्यापैकी दिलासा हा आता ग्राहकांना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT