Gold Rate Today saam tv
महाराष्ट्र

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं २,२०० रुपयांनी तर चांदी ८ हजारांनी स्वस्त

Jalgaon Gold Silver Price Today Update News : आज १६ नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं २,२०० रुपयांनी तर चांदी ८ हजार रुपयांनी स्वस्त झाली. जाणून घ्या जळगावमधील २२ आणि २४ कॅरेट सोन्यासह चांदीचे नवीन दर.

Alisha Khedekar

  • १६ नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली.

  • सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम २,२०० रुपयांची कपात झाली.

  • जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव १,२३,२०० रुपये झाला.

  • २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३४,५०० रुपये नोंदवण्यात आला.

संजय महाजन, जळगाव

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होण्याचे चित्र दिसत असून, आज १६ नोव्हेंबर रोजीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. सोन्याच्या दरात २ हजार २०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ८ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २३ हजार २०० रुपये झाला आहे. तर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३४ हजार ५०० रुपये नोंदवण्यात आला आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या या घसरणीमुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रति किलो ८ हजार रुपयांनी कमी होऊन १ लाख ७२ हजार रुपये झाला आहे. सोन्याबरोबरच चांदीचे दरही कमी झाल्याने सराफा बाजारात या घडामोडींकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

लग्नसराई, सणासुदीचे दिवस आणि भविष्यातील गुंतवणूक लक्षात घेता अनेक जण सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असतात. अशा परिस्थितीत दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरू शकते. मात्र, बाजारातील परिस्थितीनुसार सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा बदल होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : गाढ झोपेत असताना जमीन हादरली, घाबरून नागरिक घराबाहेर धावले, ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Air Pollution: हवेतील वाढतं प्रदूषण फुफ्फुसांसाठी ठरतंय धोकादायक, न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये १५ दिवसांत तब्बल २० टक्क्यांनी वाढ

घर भाड्याने घेण्यापूर्वी 5 गोष्टी नक्की तपासा

NDA कडे ३२० खासदारांचे समर्थन, तरीही दोन तृतीयांश बहुमतासाठी कसरत; काय आहे संपूर्ण राजकीय गणित?

Maharashtra News Live Update: उसाच्या दरवाढीसाठी राजू शेट्टी मैदानात! सोलापुरात शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT