Gold Price Today Saam Tv
महाराष्ट्र

Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Gold- Silver Rate Today: जळगावच्या सराफा बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली, १८- २२ आणि २४ कॅरेटचे सोन्याचे दर किती? ते घ्या जाणून...

Priya More
  • जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला

  • जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दरात ५०० रुपयांची घसरण

  • आज १ तोळा सोनं १ लाख ५१ हजार ५०० रूपयांनी विकले जात आहे

  • चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदीच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीचे दर कमी होत असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी केली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा बदल झाला आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात आज कोणताही बदल झाला नाही.

जळगाव सुवर्ण बाजारात गेल्या आठवड्याच्‍या सुरुवातीला सोने-चांदीचे भाव कमी झाले होते. त्यानंतर सलग तीन दिवस भावात घसरण झाली. मात्र, आठवड्याच्‍या शेवटी सोनं– चांदीच्‍या दरात फारसा बदल झाला नसल्‍याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच मागील ३ दिवसांपासून चांदीचे दर स्थिरावले असून सोन्‍याच्‍या दरात देखील किरकोळ घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात रोज होणारी घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्‍याने होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोनं-चांदीच्या बाजारात होत असतो. दरात सातत्याने बदल होत असताना गेल्‍या आठवड्याच्‍या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी झाले हेाते. पहिल्‍या ३ दिवसांत सोनं- चांदीचे भाव कमी झाले होते. पण बुधवारी २ तारखेपासून दरात स्थिरता आली आहे. हिच स्थिती आज ७ सप्टेबरला म्हणजे आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी देखील कायम राहिली आहे.

६ सप्‍टेंबरला २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा विनाजीएसटी भाव १ लाख ५२ हजार रुपयांवर होता. हे दर आज ७ सप्टेंबर रोजी ५०० रूपयांनी कमी होवून १ लाख ५१ हजार ५०० रूपयांवर आले आहेत. तर चांदीचे प्रतिकिलो भाव गेल्या ३ दिवसांपासून विनाजीएसटी २ लाख ३६ हजार रूपयांवर कायम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT