Gold Price Hike Saam Tv
महाराष्ट्र

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! सोन्याच्या दरात ३०००० रुपयांची वाढ, आजचे 18K- 22K आणि 24K चे दर किती?

Gold- Siler Price Hike: सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला आहे. सोनं-चांदीचे दर वाढले आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये १० तोळा सोनं ३०००० रुपयांनी महाग झाले आहे.

Priya More
  • सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ

  • २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ३० हजारांची वाढ

  • १ किलो चांदी ३ ते ५ हजार रुपयांनी महागली

  • अमेरिका-इराण तणावाचा बाजारावर परिणाम

संजय महाजन, जळगाव

सोनं- चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सोनं-चांदीचे दर कमी नाही तर वाढले आहेत. जळगावचे सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल पाहायला मिळाला. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये आज ३०००० रुपयांची वाढ झाली आहे. तर १ किलो चांदी देखील ३००० रुपयांनी वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका -इराण यांच्याताल तणाव वाढल्याने सोनं- चांदीच्या दरात सतत बदल होत आहेत. आज जळगावच्या सराफा बाजारामध्ये २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर १ लाख ५५ हजार रुपयांवर पोहचले आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याचे दर १५,५०,०० रुपयांवर पोहचले आहे.

सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. १ किलो चांदी ३००० रुपयांनी वाढली आहे. चांदीचे दर २ लाख ६६ हजारांवर पोहचले आहेत. अमेरिका- इराण यांच्यात पुन्हा तणाव निर्माण झाल्याने सोनं- चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोनं- चांदीचे दर ३००० रुपयांनी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायाला मिळत आहे. आज सराफा बाजाराकडे ग्राहकांची गर्दी कमी आहे.

दरम्यान, गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५८० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं १,५७,६४० रुपयांना विकले जात आहे. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १४५० रुपयांची वाढ झाली असून ते १,४४,५०० रुपयांना विकले जात आहे. तर १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये ११९० रुपयांची वाढ झाली असून हे सोनं १,१८,२३० रुपयांना विकले जात आहे. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये ५००० रुपयांची वाढ झाली असून ती २,८०,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT