Gokul Poll Battle: Can Satej Patil Benefit From the Mahadik-Mushrif Rift? saam tv
महाराष्ट्र

भेटीगाठींचं राजकारण, सतेज पाटील-भाजप नेत्यांच्या भेटीने समीकरणं बदलणार?

Kolhapur Political Equations Shift as Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे कोल्हापूरमधली राजकीय समीकरणं बदलली आहेत. सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची आघाडी धोक्यात आली असून दोघेही आता कुणाशी हात मिळवणी करणार? सतेज पाटील कुणाच्या भेटीगाठी घेत आहेत? यावरचा हा रिपोर्ट...

Girish Nikam

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय. मागच्यावेळी पराभव झाल्याची सल भाजप खासदार धनंजय महाडीक गटाच्या मनात आहे. तर दुसरीकडे गोकुळ ताब्यामध्ये ठेवण्यासाठी सतेज पाटील यांनी कंबर कसली आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची एकजूट होती. यंदा मात्र राजकीय समिकरणे बदलण्याची चिन्हे दिसतायेत. कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, भाजपचे सहयोगी सदस्य चंदगडचे आमदार शिवाजी पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सतेज पाटील यांनी भेटी घेतल्या. त्यामुळे या केवळ सदिच्छा भेटी आहेत की गोकुळच्या निवडणुकीची गणितं जुळवण्याचा प्रयत्न, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केलाय.

काँग्रेसचे सतेज पाटील आणि भाजप नेते धनंजय महाडीक यांच्यातील संवाद वाढतोय का ? असा सवाल केला असता मुश्रीफांनी राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असं सूचक विधान केलंय.

महाडिक-मुश्रीफ वादाचा

फायदा सतेज पाटलांचा?

गेल्या निवडणुकीतील पराभवाची महाडिक गटाच्या मनात अद्यापही सल कायम

मुश्रीफ गटानं गोकुळमध्ये तयार केलेल्या नवीन संस्थांवर महाडिक गटाचा आक्षेप

प्रारूप यादीच्या सुनावणीदरम्यान दोन्ही गट आमने-सामने आल्याने संघर्ष समोर

महायुतीत एकत्र असूनही दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत राजकीय वाद लपून राहिलेला नाही

याच गटबाजीतून काँग्रेस नेते सतेज पाटील राजकीय फायदा घेण्याची शक्यता

सतेज पाटलांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्याने जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होणार का? याची चर्चा सुरू झालीय. गोकुळच्या निवडणूक निमित्ताने महायुतीत धुसफूस सुरु आहे. त्याचा फायदा सतेज पाटील कसा उचलतात? आणि कोल्हापुरातील राजकीय समीकरणं कशी बदलणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1 वर्षाची मुदतवाढ, भैय्यांच्या मुजोरीत वाढच मुदतवाढीनंतर परप्रांतीय रिक्षाचालकांचा जल्लोष

बोगस मतदार, बोगस SIR; झेरॉक्स सेंटरवर हजारो SIR फॉर्म्स?

Fact Check: आधार कार्डवर मिळणार 3 लाखांचं कर्ज? कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकारची नवी योजना?

मनोज जरांगे 'वर्षा'वर धडकणार; 40 लाख गाड्या, 6 कोटी मराठे मुंबईत येणार

बदलीचा सपाटा! 6 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT