दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली होत्या. महायुती विरोधकांना 4 जागा देण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा होती. मात्र राजकीय घडामोडींना वेग आला असून ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे महायुतीतच जागावाटपावरून तिढा निर्माण झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतलं जागा वाटपाचं घोडं अडलंय. राष्ट्रवादीला आणखी एक जागा हवी आहे. यड्रावकर गटाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा देण्याच्या मुद्यावर अंतर्गत विरोध आहे. मंत्री हसन मुश्रीफ 10 जागांवर ठाम आहेत. तर जागा कमी होणार असल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणारेत. यामुळे महायुतीमधील निर्णय लांबणीवर पडलाय. महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला पाहुयात...
गोकुळसाठी महायुतीचा फॉर्म्युला
राष्ट्रवादी - 10 जागा
शिंदेसेना - 7 जागा
भाजप - 6 जागा
जनसुराज्य - 2 जागा
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवली जाईल आणि यात आपला हस्तक्षेप नसेल असं स्पष्ट दुसरीकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं म्हटलंय. संस्थांच्या पात्रतेचा मुद्दा, खासगीकरण आणि गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप या मु्दयाांवरुन कोल्हापुरच्या आखाड्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. आता महायुतीमध्ये एकी कायम राहणार का? मुश्रीफ सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होतात की काँग्रेसचे सतेज पाटील काही करीष्मा करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.