GOKUL ELECTION saam tv
महाराष्ट्र

Gokul Election: निवडणूक संपताच गोकुळने उचललं मोठं पाऊल, ३५० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; नेमकं कारण काय?

Gokul Takes Major Action After Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता प्रशासनाने मोठा पाऊल उचललं आहे. ३५० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

Priya More
  • गोकुळ निवडणुकीनंतर प्रशासनाने उचललं मोठं पाऊल

  • ३५० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

  • गोकुळ डेअरी आणि पशुखाद्य विभागातील कर्मचारी गैरहजर राहिल्याने कारवाई होणार

रणजित माजगावकर, कोल्हापूर

गोकुळच्या निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी विनापरवाना गैरहजर राहिलेल्या सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १ ते १९ ऑक्टोबरदरम्यान हे कर्मचारी रजा मंजूर न करून घेताच गैरहजर राहिल्याचं समोर आलं आहे. यामध्ये डेअरी आणि पशुखाद्य विभागातील कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे संघाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. ऐनवेळी रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावं लागलं, तर इतर कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही वाढला. या प्रकाराची दखल घेत प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे.

गोकुळमध्ये यापूर्वी संचालक आणि माजी संचालकांच्या माध्यमातून नोकरभरती झाल्याची चर्चा होत राहिली आहे. काही कर्मचारी नेत्यांच्या कामासाठी वापरले जात असल्याची स्थितीही वेळोवेळी समोर आली. मात्र, दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दूध संघाच्या कामावर नियमित उपस्थित राहणं बंधनकारक झालं. प्रशासकीय काळात कामाच्या वेळेत दूध संघात उपस्थित राहावं लागत असताना निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे.

१ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत सुमारे ३५० कर्मचारी रजा मंजूर करून न घेताच गैरहजर राहिल्याची माहिती आहे. यातील अनेक कर्मचारी नेत्यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याचं सांगितलं जात आहे. डेअरी आणि पशुखाद्य विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं समोर आलं आहे. अचानक मोठ्या संख्येने कर्मचारी गैरहजर राहिल्याने कामकाजाचं नियोजन बदलण्याची वेळ प्रशासनावर आली. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाज सुरू ठेवावं लागलं, तर नियमित कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडला. आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या खुलाशानंतर प्रशासन पुढे काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यातील 88 संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! 'या' सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा धक्कादायक निकाल, राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील विजयी; ४५ तासांनंतर अंतिम निकाल जाहीर

Weather Update : 'अर्णब' चक्रीवादळाचा हाहाकार! महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Headache : थंडीत अर्ध डोकं दुखतं? असू शकतो 'या' गंभीर आजाराचा संकेत!

SCROLL FOR NEXT