Gokul Election 2026 Saam Tv
महाराष्ट्र

Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा?

Gokul Dudh Sangh Nivadnuk: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. या निवणुकीसाठी जागा वाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. अशात महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More
  • गोकुळ निवडणुकीत महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

  • गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ९ जागा

  • गोकुळ निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला ७ जागा

  • गोकुळ जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेणार

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ९, तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी ७ जागा देण्याच्या सूत्रावर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. बुधवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयाकडे महायुतीच्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे.

जागावाटपाच्या बैठकीनंतर महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठकही झाली. प्रत्येक पक्षाकडून जागांची मागणी करण्यात आली असली, तरी ९-७-७ या सूत्रावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटाला एक जागा देण्याचा निर्णय झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यांच्या गटाला जागा दिल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याची एक जागा कमी होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरूच असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला जाणार आहे. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीची ही जागावाटपाची गणितं अंतिम स्वरूपात कशी येतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School Holiday: राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

माईकची तोडफोड, फाईल्स फेकल्या; प्रदुषणाच्या चर्चेवेळी महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

जिथून निवडून आले तिथे जनतेसाठी काम करा; पुढील 30 वर्ष...; अमित शाह यांची भविष्यवाणी, राहुल गांधींनाही दिला सल्ला|VIDEO

जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब, ती महिला कोण? श्रीकांत शिंदे अन् भाजपच्या २ आमदारांची नावं घेतली? शिंदेसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांना काय सांगितलं?

काँग्रेस आमदारचा भीषण अपघात; MLAच्या कारची इलेक्ट्रिक स्कूटरला जोरदार धडक

SCROLL FOR NEXT