Bhandara Crime Saam TV
महाराष्ट्र

भंडारा हादरलं; धावत्या ST बसमध्ये मुलीवर बलात्कार (पाहा Video)

भंडाऱ्यात एका अल्पवयीन मुलीवर धावत्या ST बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, आरोपी हा अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन गेला असता हे कृत्य केलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारा : भंडाऱ्यात (Bhandara District) एका अल्पवयीन मुलीवर धावत्या ST बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला फिरायला घेऊन गेला असता, त्याने हे कृत्य केल्याची माहिती उघड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. राजेश मडावी (वय १९) असं या आरोपीचं नाव असून, तो बोदरा येथील रहिवासी आहे.

आरोपीने पीडित मुलीला नागपूरला (Nagpur) फिरायला जात असल्याचा बहाणा करून साकोली येथून बसने नेले. रात्रीची वेळ आणि बसमध्ये वाहक नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने बसमधील शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्येच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, तो नागपूमधील आपल्या नातेवाईकांकडे घेऊन गेला. मात्र नातेवाईकांना या आरोपीच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यांनी राजेशला ताबडतोब घरातून बाहेर काढलं. त्यामुळे आरोपी राजेश अल्पवयीन विद्यार्थिनीसह रात्रीच बोदरा येथे परत आला.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, या मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी (Police) मुलीचा शोध सुरू केला असता, बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता मुलगी राजेशसोबत गावातच असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बोदरा गाव गाठून मुलगी आणि राजेशला ताब्यात घेतलं. दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

तपासणीनंतर पोलिसांनी आरोपी राजेश याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT