Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola News : आई-वडिलांनी गावी सोबत नेले नाही दहावीच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल, अख्खा परिसर हादरला

Akola News : आई-वडिलांनी गावाला सोबत नेले नाही म्हणून रागाच्या भरात एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली.

अॅड. जयेश गावंडे

Akola News : लहान मुलांचा हट्ट पालकांसाठी मोठी कसरत असते. मात्र मुलं रागाच्या भरात काय पाऊल उचलतील याचाही काही नेम नसतो. अशी एक घटना अकोल्यातून समोर आली आहे. आई-वडिलांनी गावाला सोबत नेले नाही म्हणून रागाच्या भरात एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना आज अकोल्यातील घडली आहे. मोठ्या उमरी परिसरातील विठ्ठलनगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

शेजल प्रवीण म्हाला असं मुलीचं नाव आहे. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. ती भारत विद्यालय शाळेमध्ये शिक्षण घेत होती. आपले आई आणि वडील नातेवाईकांच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी अकोट येथे निघाले असता शेजलने त्यांच्यासोबत येण्याचा हट्ट धरला होता. मात्र लहान भाऊ शिकवणी वर्गाला गेला आहे, तो घरीच आहे म्हणून तू घरीच थांब असं आईने सांगितलं आणि आई-वडील निघून गेले. (Latest News)

दरम्यान मुलीने आपल्या घरामध्ये रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळतात आई आणि वडील घरी परत आले. घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजलने नुकतीच दहावीच्या बोर्डाची परीक्षा दिली होती. तिचा लहान भाऊ हा पाचवीमध्ये शिक्षण घेत असून वडील रिलायन्स जिओ कंपनी अमरावती येथे काम करतात. शेजलने उचलेलं टोकाचं पाऊल धक्कादायक असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT