Sanjay Raut Saam
महाराष्ट्र

Narkatla Swarg : मोदी-शाहांना ठाकरे-पवारांनी वाचवले, राऊतांचा दावा, भाजप मंत्री संतापला, म्हणाला हे तर देशातील अतिरेकी

Girish Mahajan on Narkatla Swarg : संजय राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातील दाव्यांवर गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. राऊतांचे मोदी-शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली हा दावा फोल असल्याचे महाजन म्हणाले. या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Namdeo Kumbhar

महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातील दाव्यांवर तीव्र टीका केली आहे. राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी संकटातून बाहेर काढल्याचा दावा केला होता. यावर महाजन म्हणाले, “संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावं? ते वाटेल तशी फालतू बडबड करतात. आता त्यांना कोणी ऐकत नाही, कोणी गांभीर्याने घेत नाही.”

महाजनांनी राऊतांच्या दाव्याचा समाचार घेतला. “युद्ध सुरू असताना राऊत म्हणाले, मोदींनी आणि शाहांनी राजीनामा द्यावा. सैनिकांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. देशाबाहेरील अतिरेक्यांशी लढायचं की देशातील अशा अतिरेक्यांबद्दल लढायचं. अशा माणसाबद्दल न बोललेलेच बरे,” असे महाजन म्हणाले. राऊतांनी ठाकरे कुटुंबाशी मोदी-शाह यांनी निर्घृण वर्तन केल्याचा आरोप केला होता, यावर महाजनांनी राऊतांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केले. “खऱ्या शिवसेनेसोबत, बाळासाहेबांच्या विचारांसोबत आम्ही आहोत. काँग्रेसच्या मांडीवर बसून विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावं? ते वाटेल तशी फालतू बडबड करतात. आता त्यांना कोणी ऐकत नाही, कोणी गांभीर्याने घेत नाही. संजय राऊत कसा माणूस आहे, हे सर्वांना माहित आहे. त्यांच्या पुस्तकाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
गिरीश महाजन, मंत्री, महाराष्ट्र

राऊतांच्या पुस्तकाला महत्त्व न देण्याचे आवाहन करताना महाजन म्हणाले, “राऊत कसा माणूस आहे, हे सर्वांना माहित आहे. त्यांच्या पुस्तकाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.” शनिवारी होणाऱ्या पुस्तक प्रकाशन समारंभात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राऊतांचे दावे आणि महाजनांचा पलटवार यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT