Girish Mahajan And Bharat Gogawale Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: रायगड-नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, या २ नेत्यांवर जबाबदारी, कुणाला बसला धक्का?

Girish Mahajan And Bharat Gogawale: नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर आज सुटला. नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची निवड करण्यात आली.

Priya More
  • रायगड आणि नाशिकला पालकमंत्री मिळाले

  • रायगच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले

  • नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन

  • फडणवीस सरकारने केली घोषणा

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला. रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात फडणवीस सरकारने अधिकृत घोषणा करत परिपत्रक जारी केले आहे.

राज्यामध्ये फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रायगडमध्ये आदिती तटकरे यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती तर गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण या दोन्ही ठिकाणी राजकीय वातावरण तापल्यानंतर अवघ्या २४ तासांत दोघांचे पालकमंत्रिपद रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दीड वर्षे झाली तरी देखील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला नव्हता. अखेर आज फडणवीस सरकारने या दोन्ही जिल्ह्यांना पालकमंत्री दिला आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. रायगडमध्ये पालकमंत्रिपदासाठी तटकरे विरुद्ध गोगावले असा वाद सुरू होता. हे पद कुणाकडे जाणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होत्या. आदिती तटकरे यांना हे पद मिळावे यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू होते. तर भरत गोगावले यांनी हे पद कुणाकडे जाऊ नये यासाठी ताकद पणाला लावली होती. अखेर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला. शिवसेना शिंदेगटाने यामध्ये बाजी मारली. पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांचे नाव जाहीर करण्यात आले.

महत्वाचे म्हणजे या १५ ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण भरत गोगावले यांच्या हस्तेच करण्यात आले होते. तर रायगडचे पालकमंत्रिपद हे आपल्यालाच मिळणार असा ठाम विश्वास भरत गोगावले यांना होता आणि त्यांचा विश्वास खरा ठरला. पालकमंत्रिपद भरत गोगावले यांच्याकडे येताच शिवसेना शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांकडून भरत गोगावले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

तर दुसरीकडे नाशिकमध्ये देखील पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू होती. गिरीश महाजन, छगन भुजबळ यांच्यामध्ये पालकमंत्रिपदावरून वाद सुरू होता. पण आता फडणवीस सरकारकडून गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT